निवडणूक आयोग कुणाच्या इशाऱ्यावर काम करतंय? : नाना पटोले
उत्तर प्रदेश तसेच इतर राज्यांची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस तयार आहे. यावेळी परिवर्तनाची लहर दिसेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केलाय.
देशात पाच राज्यांमध्ये निवडणुकांची लवकरच घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. पाच राज्यांची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने केलेल्या तयारीवर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. उत्तर प्रदेश तसेच इतर राज्यांची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस तयार आहे. यावेळी परिवर्तनाची लहर दिसेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केलाय. ते पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी निवडणूक आयोग कुणाच्या इशाऱ्यावर काम करतंय ? असं म्हणतं निवडणूक आयोगालाही लक्ष्य केलं.
Published on: Jan 08, 2022 01:09 PM
Latest Videos