Nagpur | ओबीसी आरक्षण संदर्भातली सुनावणी होईपर्यंत निवडणुका घेवू नये - नाना पटोले

Nagpur | ओबीसी आरक्षण संदर्भातली सुनावणी होईपर्यंत निवडणुका घेवू नये – नाना पटोले

| Updated on: Dec 13, 2021 | 7:56 PM

जोपर्यंत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच प्रश्न सुटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. सर्वोच्च न्यायालयात उद्या होणाऱ्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारच्यावतीनं उद्या हीच भूमिका मांडली जाणार आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवूनच या निवडणुका व्हाव्या, अशी अपेक्षा असल्याचंही पटोले यावेळी म्हणाले.

नागपूर : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) उद्या महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका (Local Body Elections) लागलेल्या आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाचे मत स्पष्ट आहे की जोपर्यंत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच प्रश्न सुटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. सर्वोच्च न्यायालयात उद्या होणाऱ्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारच्यावतीनं उद्या हीच भूमिका मांडली जाणार आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवूनच या निवडणुका व्हाव्या, अशी अपेक्षा असल्याचंही पटोले यावेळी म्हणाले.

तसंच ओबीसी आरक्षणाच्या विषयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणं झालं आहे. राज्य सरकारनंही उद्याच्या सुनावणीसाठी चांगले वकील नेमलेले आहेत. ओबीसी आरक्षण कायम राहिल यासाठी राज्य सरकारची तयारी पूर्ण झाल्याचंही पटोले यावेळी म्हणाले. अनेक ठिकाणी ओबीसी समाजाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सरसकट रद्द कराव्या, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं पटोले यांनी सांगितलं.

Published on: Dec 13, 2021 07:56 PM