Nana Patole | रावसाहेब दानवे यांच्याकडे 3 खाती आहेत, …मात्र ते बिनकामाचे मंत्री – नाना पटोले
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वापरलेली भाषा त्यांचा कुसंस्कृतपणा दाखवतो, असं प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
मुंबई : मोदी सरकारमधील राज्यातील मंत्री जनआशीर्वाद यात्रेच्या नावाखाली विरोधी पक्षांना फक्त शिव्या देण्याचे काम करत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर येऊन टीका करणे हाच भारतीय जनता पक्षाचा एकमेव कार्यक्रम आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वापरलेली भाषा त्यांचा कुसंस्कृतपणा दाखवतो, असे प्रत्युत्तर देत मोदी सरकारने 7 वर्षात महागाई, बेरोज़गारी, गरिबी, जीडीपी, अर्थव्यवस्थेवर काय दिवे लावले ते जनतेला सांगा, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. (Nana Patole slams raosaheb danve over Rahul Gandhi Statement)
Latest Videos