Nanded: कुठल्याही वयात,अवस्थेत माणसाला पाण्यातून जाण्याशिवाय पर्याय नाही, कंटाळून गावाचा निवडणुकीवर बहिष्कार!

Nanded: कुठल्याही वयात,अवस्थेत माणसाला पाण्यातून जाण्याशिवाय पर्याय नाही, कंटाळून गावाचा निवडणुकीवर बहिष्कार!

| Updated on: Jul 17, 2022 | 12:47 PM

नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. शेवटी आता गांधीनगरने निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. का म्हणून आम्ही मतदान करायचं असा प्रश्न आता गावकरी विचारत आहेत. गावकऱ्यांना आता काम हवंय!

नांदेड: नांदेडच्या गांधीनगर (Gandhinagar Nanded) गावात स्वातंत्र्यकाळापासून रस्ते नाहीत. नांदेड मधील अनेक वसाहती या सोयीसुविधांपासून वंचित आहेत. गांधीनगर गावातील लोकांना दवाखान्यात (Hospital) जाताना पाण्यातून जावं लागतं. गरोदर स्त्रिया, शाळकरी मुलं, आजारी माणसं.. माणूस कुठल्याही अवस्थेत असू, कुठल्याही वयात असू या गावकऱ्यांना पाण्यातून चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. अनेक वेळा प्रशासनाला विनंती करून सुद्धा इथे एकही सरकारी अधिकारी पाहणीसाठी गेलेला नाही. अजूनही या गावात रस्ते नाहीत. नागरिकांचे (Citizens) प्रचंड हाल होत आहेत. शेवटी आता गांधीनगरने निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. का म्हणून आम्ही मतदान करायचं असा प्रश्न आता गावकरी विचारत आहेत. गावकऱ्यांना आता काम हवंय!

 

 

Published on: Jul 17, 2022 12:47 PM