नांदेडमध्ये काँग्रेला धक्का, मंगेश कदम यांचा शिवसेनेत प्रवेश अन् बोलून दाखवली नाराजी
VIDEO | काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना मोठा धक्का, नांदेडचे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आणि मागासवर्गीय विभाग विकास काँग्रेस कमिटीचे सदस्य मंगेश कदम यांचा शिवसेनेत प्रवेश, का केला पक्षप्रवेश सांगितलं कारण?
मुंबई, ७ सप्टेंबर २०२३ | नांदेडचे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आणि मागासवर्गीय विभाग विकास काँग्रेस कमिटीचे सदस्य मंगेश कदम यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचा पक्षप्रवेश हा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना धक्का समजला जात आहे. मंगेश कदम हे नांदेड जिल्हा परिषदेचे काँग्रेस पक्षाचे सहा वेळा नगरसेवक होते. तर त्यांच्या पत्नी ह्या माजी समिती सदस्य होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाने प्रभावित झाल्यामुळे आणि काँग्रेस पक्षाने आपला वापर करून नंतर आपल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे मत यावेळी कदम यांनी व्यक्त केले. मंगेश कदम यांच्यासह त्यांची पत्नी आणि नांदेडमधील माजी स्थायी समिती सदस्य ज्योती मनीष कदम, ऍड. धम्मपाल कदम, विकास गायकवाड, प्रवीण वाघमारे यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.