'अशोक चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का? मला चिंता', भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी

‘अशोक चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का? मला चिंता’, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी

| Updated on: Feb 28, 2024 | 1:48 PM

भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना अशोक चव्हाणांच्या पक्ष प्रवेशाचे गणित सुटेना झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या बूथ कार्यकर्ता बैठकीत भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांनी चक्क अशोक चव्हाण यांच्या उपस्थित त्यांना अजगराची उपमा देवून शंका उपस्थित केलीय

नांदेड, २८ फेब्रुवारी, २०२४ : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात पंधरा दिवस उलटून गेले असेल तरी अद्यापही भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना अशोक चव्हाणांच्या पक्ष प्रवेशाचे गणित सुटेना झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या बूथ कार्यकर्ता बैठकीत भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांनी चक्क अशोक चव्हाण यांच्या उपस्थित त्यांना अजगराची उपमा देवून शंका उपस्थित केलीय. खासदार अजित गोपछडे म्हणले की, अशोक चव्हाण साहेब आता तुम्ही आमच्यात आलात, तुम्हाला हळूहळू सर्व सिस्टीम समजायला उशीर लागेल. मात्र मला असं वाटतंय की तुम्ही भाजपमध्ये जावून आजगरा एवढे मोठे होता की काय? खासदार अजित गोपछडे यांनी चिंता व्यक्त केली आहे.तर भारतीय जनता पार्टी ही भल्या भल्यांना समजत नाही, मलाही माहिती नव्हत खासदारकीसाठी माझं नाव येईल, पण अचानक ते आलं, त्यामुळे भारतीय जनता पार्टी समजून घेण्यासाठी तिचे चिंतन आणि विचार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले आणि मिश्कील वक्तव्य केले.

Published on: Feb 28, 2024 01:48 PM