रस्ता नसल्यानं मृतदेह झोळीत नेण्याची वेळ; नांदेड जिल्ह्याच्या दुर्गम भागातील भीषण वास्तव

| Updated on: Aug 09, 2023 | 4:00 PM

VIDEO | धक्कादाय ! रस्ता नसल्याने मृतदेहाची हेळसांड, या घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल, रस्ता करून देण्याची गावकऱ्यांची मागणी...

नांदेड, ९ ऑगस्ट २०२३ | नांदेड जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या किनवट तालुक्यातील जगदंबा तांडा येथील भीषण वास्तव समोर आलं आहे. नांदेड जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या किनवट तालुक्यातील जगदंबा तांडा या वस्तीला जायला रस्ता नसल्याने गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत, गावातील संतोष चव्हाण या तरुणांचा त्याच्या सासुरवाडीत मृत्यू झाला. त्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी संतोषच्या मृतदेहाची झोळी करत गावकऱ्यांनी मृतदेह गावात आणला आहे. या घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या गावाला रस्ता नसल्याने मृतदेहाची होणारी हेळसांड या व्हिडीओ मधून उघड होतेय. किमान आता तरी आम्हाला रस्ता करून द्यावा अशी मागणी जगदंबा तांडा इथल्या गावकऱ्यांनी केली आहे. यानंतर तरी प्रशासन या गावकऱ्यांची मागणी पूर्ण करतंय का याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Aug 09, 2023 04:00 PM