Video | पगार वेळेवर होत नसल्याने नांदेडमध्ये एसटीचे कर्मचारी आक्रमक

Video | पगार वेळेवर होत नसल्याने नांदेडमध्ये एसटीचे कर्मचारी आक्रमक

| Updated on: Aug 21, 2021 | 7:01 PM

पगार वेळेवर होत नसल्यामुळे नांदेडमध्ये एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी राज्य सरकारविरोधात  आंदोलन करुन आमचा पगार वेळेवर करावा अशी मागणी केली आहे. पगारी वेळेवर होत नसल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आज नांदेडमध्ये काळ्या फिती लावून काम केलंय.

नांदेड : पगार वेळेवर होत नसल्यामुळे नांदेडमध्ये एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी राज्य सरकारविरोधात  आंदोलन करुन आमचा पगार वेळेवर करावा अशी मागणी केली आहे. पगारी वेळेवर होत नसल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आज नांदेडमध्ये काळ्या फिती लावून काम केलंय. यावेळी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी करत वेळेवर पगार देण्याची मागणी केलीय. दर महिन्याला एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा खंड पडतोय, त्यामुळे कर्मचाऱ्यांची उपासमार होतेय. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी आजच्या आंदोलनातून केलीय.