पेपरला ५०० रूपयांची जोडली नोट अन् पास करण्याची केली विनंती, विद्यापीठाकडून मोठी कारवाई

पेपरला ५०० रूपयांची जोडली नोट अन् पास करण्याची केली विनंती, विद्यापीठाकडून मोठी कारवाई

| Updated on: Sep 08, 2023 | 8:23 AM

VIDEO | नांदेड विद्यापीठाच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या तब्बल १ हजार ७२० विद्यार्थ्यांवर विद्यापीठाने कारवाई केल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांना चार परीक्षेला बंदी घालण्यात आले आहे

नांदेड, ८ सप्टेंबर २०२३ | नांदेड विद्यापीठाच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. पेपरला एका विद्यार्थ्यांने पाचशे रूपयांची नोट जोडून पास करण्याची विनंती केली होती, हा प्रकार विद्यार्थ्याला चांगलाच महागात पडला आहे. नांदेड विद्यापीठाच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या तब्बल १ हजार ७२० विद्यार्थ्यांवर विद्यापीठाने कारवाई केल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांची सर्व संपादणूक रद्द करत त्या विद्यार्थ्यांना चार परीक्षेला बंदी करण्यात आली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याने तर चक्क सातही पेपरला प्रत्येकी पाचशे रुपयांची एक नोट जोडून मला पास करा, असे लिहिल्याचे आढळून आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांवर कारवाई होण्याची दहा वर्षातील ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Sep 08, 2023 08:22 AM