Gandhidham-Puri Express : नंदुरबारमध्ये गांधीधाम पुरी एक्स्प्रेसला मोठी आग, कारण अस्पष्ट
नंदुरबारमध्ये गांधीधाम एक्सप्रेसला आग लागली आहे. नंदूरबार स्थानकात एक्सप्रेस पोहोचण्यापूर्वीच भीषण आग लागल्याने प्रवाशी प्रचंड हादरून गेले. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची एक्सप्रेसमध्ये एकच धावपळ उडाली.
नंदुरबारमध्ये गांधीधाम एक्सप्रेसला आग लागली आहे. नंदुरबार स्थानकात एक्सप्रेस पोहोचण्यापूर्वीच भीषण आग लागल्याने प्रवाशी प्रचंड हादरून गेले. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची एक्सप्रेसमध्ये एकच धावपळ उडाली. काही प्रवाशांनी तर घाबरून आरडाओरड सुरू केली. किंचाळ्या आणि गोंगाटामुळे एक्सप्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला. भडकत जाणारी आग आणि त्यामुळे पसरलेल्या धुराच्या लोट पसरल्याने काही प्रवाशांना तर श्वास घेण्यासही त्रास झाला.
Published on: Jan 29, 2022 11:28 AM
Latest Videos