पाण्याचा प्रवाह अन् पुलावरील खड्ड्यांमुळे कार अर्धी बुडाली अन्…
विसरवाडी गावाजवळ सरपणी छोटा पूलवर इको कार पाण्यात वाहून जाताना; दोन जणांचे प्राण वाचले.... महामार्गावर दिशादर्शक फलकाचा अभावामुळे रात्री अपरात्री अपघाताची घटना घडत आहे. त्यासाठी संबंधित महामार्ग प्राधिकरण विभाग आणि महामार्ग ठेकेदार कंपनीने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावानजीक सरपणी नदीवरील छोटा पूल पाण्याखाली गेला आहे. या दरम्यान, एका कारला पुलावरील पाण्याच्या प्रवाह आणि खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अर्धी बुडाल्याचे पाहायला मिळाले. पूल पाण्याखाली गेल्याने वाहन चालक थोडक्यात बचावल्याचे पाहायला मिळाले. तर रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने गाडी पुलाखाली गेली मात्र पाणीचा प्रवाह कमी होता त्यामुळे गाडी आणि चालक थोडक्यात वाचले आहेत. पाण्याचा प्रवाह आणि पुलावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे त्या पाण्यात कार मार्गस्थ करण्याच्या प्रयत्नात पाण्यात वाहून जाताना कार थोडक्यात बचावली तर पुलावरील पाण्यात कार अर्धी बुडाली आहे. त्यातून दोन प्रवाशांनी आपली कार सोडून आपला जीव बाचवला. विसरवाडी नजीक महामार्गावरील मोठ्या पुलानजीक असलेल्या छोट्या पुलावर ही घटना काल रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.