वडील अजितदादांसोबत सत्तेत अन् मुलं वेगळ्या दिशेनं? मुलांसाठी बापांचा प्लॅन बी तयार?

वडील अजितदादांसोबत सत्तेत अन् मुलं वेगळ्या दिशेनं? मुलांसाठी बापांचा प्लॅन बी तयार?

| Updated on: Sep 17, 2024 | 11:56 AM

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या राष्ट्रवादीच्या निकालामुळे अजित दादा यांच्या राष्ट्रवादीतील काही नेते आपल्या मुलांसाठी प्लान बी आखत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे. नरहरी झिरवळ यांच्यापासून सुरू झालेला हा सिलसिला आता वाढत चालला आहे.

फक्त भेटीसाठी आपणच आपल्या मुलाला शरद पवार यांच्या गटाच्या कार्यक्रमाला पाठवल्याचा खळबळजनक दावा नरहरी झिरवळ यांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी झिरवळांहून वेगळी भूमिका घेत त्यांचा मुलगा गोकुळ झिरवळ हा शरद पवार गटाच्या कार्यक्रमात गेला होता. त्याठिकाणी उमेदवारीची इच्छा देखील नरहरी झिरवळ यांच्या मुलाने व्यक्त केली होती. त्यावेळी आपला मुलगा कुठेही जाणार नसल्याचे सांगणाऱ्या झिरवळ यांनी आता वेगळाच दावा केला आहे. तुर्तास या भूमिकेवर गोकुळ झिरवळ यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही तर ते दोन महिन्यांपासून माध्यमांपासून दूर आहेत. मात्र मुलाला शरद पवार यांच्या कार्यक्रमाला पाठवून झिरवळ यांनी दबाव तंत्रानं महायुतीत आपली उमेदवारी पदरात पाडून घेतल्याची चर्चा आहे. जयंत पाटील यांच्या कार्यक्रमानंतर आपण निष्ठावंत असल्याचा दावा गोकुळ झिरवळ यांनी केला होता. मात्र तुम्ही निष्ठावान आहात मग वडिलांनी गद्दारी केली का? या प्रश्नावर मात्र ते गडबडले होते. बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Sep 17, 2024 11:56 AM