तर कदाचित तू नसतास, नारायण राणेंचे राऊतांवर गंभीर आरोप, कुंडली मांडण्याची धमकी

तर कदाचित तू नसतास, नारायण राणेंचे राऊतांवर गंभीर आरोप, कुंडली मांडण्याची धमकी

| Updated on: Feb 16, 2022 | 6:57 PM

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच राऊतांची कुंडली माझ्याकडे आहे, ती मला मांडायला लावू नका असा इशारा देखील यावेळी राणेंनी दिलाय.

मुंबई : मंगळवारी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना भवनासमोर पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजप (bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता नारायण राणे यांनी देखील आज पत्रकार परिषद घेतली असून, त्यांनी राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. लोकप्रभामध्ये असताना राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आता तेच राऊत म्हणतात की, माझ्यामागे माननीय बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचा आर्शीवाद आहे. मात्र संजय राऊतांनी हे विसरू नये की त्यांची कुंडली माझ्याकडे आहे. मी ती केव्हाही बाहेर काढू शकतो असा इशारा यावेळी नारायण राणे यांनी राऊतांना दिला आहे.