Narsayya adam | दडपशाही सुरु राहिल्यास महाराष्ट्र बंद करावा लागेल : नरसय्या आडम
एसटीच्या संपावरुन कामगारांवर दडपशाही होत आहे, असा आरोप आडम मास्तर यांनी केलाय. इतकंच नाही तर ही दडपशाही सुरुच राहिल्यास महाराष्ट्र बंद करावा लागेल. अनिल परब साहेब, आम्ही मोदींना वाकवलं तुम्हाला वाकवायला किती वेळ लागणार, इशा शब्दात आडम मास्तर यांनी अनिल परब यांना इशारा दिला आहे.
राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा करण्यात आली असली तरी एसटी कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, काही भागात मात्र एसटी बस सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नरसय्या आडम मास्तर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. तसंच परिवहन मंत्री अनिल परब यांना सूचक इशाराही दिलाय. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाकडून आझाद मैदानात महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राकेश टिकैत आणि योगेंद्र यादवही उपस्थित होते.
एसटीच्या संपावरुन कामगारांवर दडपशाही होत आहे, असा आरोप आडम मास्तर यांनी केलाय. इतकंच नाही तर ही दडपशाही सुरुच राहिल्यास महाराष्ट्र बंद करावा लागेल. अनिल परब साहेब, आम्ही मोदींना वाकवलं तुम्हाला वाकवायला किती वेळ लागणार, इशा शब्दात आडम मास्तर यांनी अनिल परब यांना इशारा दिला आहे. तत्पूर्वी आडम मास्तर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनला पाठिंबा दिला आहे. 9 नोव्हेंबर रोजी सोलापूर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांच्या संपाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी संपाला सक्रीय पाठिंबा जाहीर केला होता.

'जो बिरोबाचा नाही झाला..', संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांवर पलटवार

पहिल्यांदाच धस-मुंडे एकत्र, नामदेव शास्त्री एकाच वाक्यात म्हणाले...

बेडकासारख्या उड्या मारत आलेले आम्हाला शिकवणार का?

बारमध्ये डान्स अन् हातात रायफल... PSI रणजीत कासलेंचा व्हिडीओ व्हायरल
