Special Report | ‘त्या’ आरोपांमुळं Narayan Rane आणि Nitesh Rane अडचणीत?
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची गेल्या तब्बल पाच तासापासून चौकशी सुरू आहे. राणेंचा अटकपूर्व जामीन मजूर झाला असला तरी दिशा सॅलियनच्या (Disha Salian case) पालकांनी केलेल्या तक्रारीवरून ही चौकशी सुरू आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची गेल्या तब्बल पाच तासापासून चौकशी सुरू आहे. राणेंचा अटकपूर्व जामीन मजूर झाला असला तरी दिशा सॅलियनच्या (Disha Salian case) पालकांनी केलेल्या तक्रारीवरून ही चौकशी सुरू आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi) नेत्यांना ईडी तासनतास बसवत आहे. तर दुसरीकडे राणेंनाही पोलिसांनी तासंतास बसवलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. दिशा सॅलियनचा बलात्कार करून हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप राणेंनी केला होता. त्यानंतर बदनामी केल्याची तक्रार दिशाच्या पालकांनी राणेंविरोधात केली आहे. याच प्रकरणात मालवणी पोलिसांत राणेंची चौकशी सुरू आहे. नितेश राणे यांच्याविरोधातही ही तक्रार झाली आहे. नितेश राणे आणि मुंबईच्या महापौर यांच्यात यावरून वादही झाला आहे.
Published on: Mar 05, 2022 08:53 PM
Latest Videos