Narayan Rane UnCut | विविध प्रश्नांवरुन नारायण राणेंचा मविआ सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेने दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळविला आहे. त्यानंतर शिवसेनेने थेट भाजपलाच थेट आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. त्यावरून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे.
शिवसेनेने दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळविला आहे. त्यानंतर शिवसेनेने थेट भाजपलाच थेट आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. त्यावरून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच आहे, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी चढवला आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. बऱ्याच दिवसाने मी तुमच्यासमोर आलो आहे. काहींचे फटाके ऐकत होतो. संजय राऊतांचे अग्रलेख दोन दिवसांपासून वाचत होतो. देशात पोटनिवडणुका झाल्या. एक जागा अपक्ष उमेदवार जिंकला. शिवसेनेने मात्र डंका सुरू केला आम्ही जिंकलो. महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही जिंकलो असा डंका पिटत आहेत सर्वत्र. मी मुद्दामहून त्या विजयी उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. बॅट घेऊन उभा असलेला फलंदाज ही त्या उमेदवाराची निशाणी आहे. दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय शिवसेनेला आहेच, असा सणसणीत टोला राणेंनी लगावला.