सावंतवाडीचा आमदार शेंबडा, कसला आमदार निवडून दिला? नारायण राणे यांचं दीपक केसरकरांवर टीकास्त्र
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर पुन्हा एकदा सावंतवाडीत घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जोरदार टीका केली. सावंतवाडीचा आमदार शेंबड्या आहे. कसला आमदार निवडून दिला ? विधानसभेत साधं बोलता येत नाही, अशी घणाघाती टीका राणे यांनी केसरकरांच्या होमग्राऊंडवर जाऊन केली
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर पुन्हा एकदा सावंतवाडीत घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जोरदार टीका केली. सावंतवाडीचा आमदार शेंबड्या आहे. कसला आमदार निवडून दिला ? विधानसभेत साधं बोलता येत नाही, अशी घणाघाती टीका राणे यांनी केसरकरांच्या होमग्राऊंडवर जाऊन केली. मी आमदार आणि मंत्री असताना विधानसभेत जे काम केले त्याची दखल आजही विधानभवनात घेतली जाते. मी विधानसभा गदागदा हलवून सोडली. मात्र हे तुमचे पिल्लू काहीच करत नाही. अशी खोचक टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर केली.
Latest Videos