Rain Update | नारायण राणे, देवेंद्र फडणवीस पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

Rain Update | नारायण राणे, देवेंद्र फडणवीस पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

| Updated on: Jul 25, 2021 | 10:53 AM

आज केंद्रिय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) कोकण दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या संमतीने कोकणचा दौरा करतोय. फडणवीस-दरेकर साथीला असणार आहेत, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

कोकणात जोरदार पावसाने आणि त्यामुळे आलेल्या पुराने, झालेल्या दुर्घटनांनी होत्याचं नव्हतं झालंय. कोकणची साधी भोळी माणसं उन्मळून पडलीत. कालपर्यंत समृद्ध असणारी माणसं आज संकटात सापडलीत. रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल 40 लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली. या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रिय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) कोकण दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या संमतीने कोकणचा दौरा करतोय. फडणवीस-दरेकर साथीला असणार आहेत, असं ट्विट त्यांनी केलं आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील चिपळूणचा दौरा करत आहेत. मात्र त्यांचा उल्लेख राणेंनी आपल्या ट्विटमध्ये केलेला नाही.

मोदींच्या संमतीने दौरा, माझ्या साथीला-फडणवीस दरेकर

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्‍यासह रायगड जिल्ह्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत, असं ट्विट नवनिर्वाचित केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी केलं.

Published on: Jul 25, 2021 10:53 AM