Special Report | आधी थोरले भिडले...आता धाकट्यांमध्ये वाद रंगला

Special Report | आधी थोरले भिडले…आता धाकट्यांमध्ये वाद रंगला

| Updated on: Dec 29, 2021 | 10:30 PM

राज्यात सध्या राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. आधी नितेश राणे यांच्या घोषणावरून वाद झाला आणि आता नितेश राणेंच्या शोधावरून. मी व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही, असे उत्तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली पोलिसांना पत्राद्वारे दिले आहे.

राज्यात सध्या राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. आधी नितेश राणे यांच्या घोषणावरून वाद झाला आणि आता नितेश राणेंच्या शोधावरून. मी व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही, असे उत्तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली पोलिसांना पत्राद्वारे दिले आहे. राणे यांना कणकवली पोलिसांनी आज दुपारी 3 वाजता चौकशीसाठी हजर रहा, अशी नोटीस दिली होती. खरे तर काल झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत, असा सवाल नारायण राणे यांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असे उत्तर दिले होतं. आता याबाबतच पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून नितेश राणेंची माहिती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, याकरिता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तर दुसऱ्या बाजूला सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत. शिवाय त्यांच्या जामिनावरची आज सुरू असलेली सुनावणीही आता उद्या होणार आहे. याच अनुषंगाने नितेश कुठे आहेत, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली होती. त्यांच्या घरावर ही नोटीस चिपकावण्यात आली. मात्र, दहा मिनिटांत ही नोटीस काढून टाकण्यात आली.