कल्याण-डोंबिवलीतील तिढा सुटला!, उमेदवार निश्चित? रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणेंकडून स्वतःच्या उमेदवारीचे संकेत

कल्याण-डोंबिवलीतील तिढा सुटला!, उमेदवार निश्चित? रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणेंकडून स्वतःच्या उमेदवारीचे संकेत

| Updated on: Apr 08, 2024 | 11:17 AM

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. मात्र शनिवारी नारायण राणे यांनी याच मतदारसंघातून आपल्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिलेत. सिंधुदुर्गातील ८ तालुके ३ मतदारसंघ राजापूर चौथा आहे. या ४ विधानसभा मतदारसंघात लीड मिळाला तर मी जिंकलोच...

महायुतीमध्ये कल्याण-डोबिंवली आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून तिढा निर्माण झाला होता. अशातच नारायण राणे यांनी स्वतःच्या लोकसभा निवडणुकीचे स्पष्ट संकेत स्वतः दिलेत. दुसरीकडे कल्याण-डोबिंवलीमधील वादही सुटताना दिसतोय. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. मात्र शनिवारी नारायण राणे यांनी याच मतदारसंघातून आपल्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिलेत. सिंधुदुर्गातील ८ तालुके ३ मतदारसंघ राजापूर चौथा आहे. या ४ विधानसभा मतदारसंघात लीड मिळाला तर मी जिंकलोच, असे वक्तव्य करत नारायण राणे यांनी केलं आहे. तर रत्नागिरी-चिपळूणमधून दोन लाखांनी लीड मिळेल, असा विश्वास देखील नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून निर्णय होणार असल्याचेही नारायण राणे यांनी सांगितले. पक्षाने दिलेली जाबाबदारी चोख पद्धतीने पार पाडणार असल्याचेही राणेंनी म्हटलेय. बघा स्पेशल रिपोर्ट… नारायण राणे आपल्या उमेदवारी आणि विजयाबद्दल काय म्हणाले?

Published on: Apr 08, 2024 11:17 AM