केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रश्नपत्रिका केरळची अन् उत्तर दिलं तामिळनाडूचं!
लोकसभा असो की विधानसभा. अनेक गमती-जमती होताना आपण पाहतो. तसाच एक धमाल किस्सा घडला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केरळच्या खासदाराला चक्क तामिळनाडूचे उत्तर दिले. शेवटी सभापती महोदयांनी ही चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर राणेंचा चेहरा पाहण्यासारखा झाला.
लोकसभा असो की विधानसभा. अनेक गमती-जमती होताना आपण पाहतो. तसाच एक धमाल किस्सा घडला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केरळच्या खासदाराला चक्क तामिळनाडूचे उत्तर दिले. शेवटी सभापती महोदयांनी ही चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर राणेंचा चेहरा पाहण्यासारखा झाला. दरम्यान, यापू्र्वीही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा लोकसभेतील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ‘डीएमके’च्या नेत्या कनिमोझी यांनी नारायण राणे यांना त्यांच्या खात्याबद्दल इंग्रजीमध्ये प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे नारायण राणे यांना नीट उत्तर देता आले नव्हते. कोरोनामुळे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सरकारच्या योजना उद्योजकांपर्यंत पोहोचल्या नाहीत, केंद्र सरकार पावलं उचलणार का ? , असा प्रश्न खासदार कनिमोझींनी नारायण राणेंना विचारला होता. कनिमोझी यांनी विचारलेला प्रश्न आपण नीट ऐकला आणि समजलाही. मात्र, लोकसभा अध्यक्षांना असे वाटले की मला प्रश्न समजला नाही, म्हणून त्यांनी पुन्हा हिंदीत प्रश्न सांगितला, असे नारायण राणे म्हणाले होते. त्यानंतर राणेंमुळे लोकसभेत महाराष्ट्राची मान खाली गेली, अशी टीका शिवसेनेने केली होती.