Narayan Rane | मी अजित पवारांना 100 कोटी देऊन जा म्हणालो, नारायण राणेंचा अजित पवारांना टोला
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेलं होतं, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेलं होतं, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. सिंधुदुर्गात (Sindhudurg) पत्रकारांशी बोलताना नारायण राणे बोलत होते. पत्रकार परिषदेदरम्यान नारायण राणे यांना अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना नारायण राणे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय. कारभार करायला अक्कल लागते, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांचं हे वक्तव्य अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून होतं, असा टोला नारायण राणेंनी लगावला. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी सरकारमधील केलेल्या कारभारात किती अक्कल लावली आहे, हे जनतेला कळून चुकलं आहे, असं म्हणत राणेंनी अजित पवारांना उत्तर दिलंय.