Narayan Rane | ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडेल : नारायण राणे

Narayan Rane | ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडेल : नारायण राणे

| Updated on: Sep 18, 2021 | 6:33 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना भावी सहकारी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत युतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा दावाही त्यांनी केलाय. त्याबाबत विचारलं असता नारायण राणे यांनी राऊतांवर जोरदार हल्ला चढवलाय.

संजय राऊत यांनी हे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असं वक्तव्य केलं आहे. त्याबाबत विचारलं असता राऊतांनी एकदा तर 25 वर्षे सत्तेत राहू असा दावा केला होता. ते काय घेऊन बोलतात माहिती नाही. पाणी पितात की अजून काही… अशा शब्दात राणे यांनी राऊतांवर खोचक टीका केलीय. तसंच चंद्रकांत पाटील मंत्री बनण्यासाठी शिवसेनाच पाहिजे का? इतर पक्षही आहेत, असं सूचक वक्तव्यही राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केलं. संजय राऊतांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत काय माझा बॉस आहे का? मी त्याच्या प्रश्नाला का उत्तर देऊ, असंही राणे म्हणाले.