Narayan Rane | दिल्लीला धडक मारलं तर डोकं जागेवर राहणार नाही, नारायण राणेंचा सेनेवर हल्लाबोल
भाजपा नेते आणि सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाविकास आघाडी आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
भाजपा नेते आणि सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाविकास आघाडी आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दादरा नगर हवेली लोकसभा मतदार संघात काही दिवसांपूर्वीच पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीमध्ये दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी भाजपा उमेदवाराचा पराभव करत बाजी मारली. कलाबेन डेलकर यांच्या रुपाने शिवसेनेने प्रथमच महाराष्ट्राबाहेर लोकसभा जागा जिंकण्याची किमया साधली. मात्र आता यावरून राजकारण सरू झाले आहे. दादरा नगर हवेलीमध्ये शिवसेनेने भगवा फडकवला आहे, आता दिल्ली दूर नाही असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. मात्र आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राणे यांनी राऊतांना जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. राऊतांनी पहिले आपले खासदार सांभाळावेत, दिल्लीला धडक मारायला आल्यावर डोके जाग्यावर राहाणार नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.