Narayan Rane  | राडा झाला नाही वैभव नाईक पळाला : नारायण राणे

Narayan Rane | राडा झाला नाही वैभव नाईक पळाला : नारायण राणे

| Updated on: Jun 19, 2021 | 5:45 PM

वैभव नाईकने काही हल्ला केला नाही. तुमच्याकडे फुटेज असेल तर पाहा. उलट तो पळून गेला. तो कसला हल्ला करतोय, असं नारायण राणे म्हणाले.

नारायण राणे पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांवर निशाणा साधला. परवा झालेल्या हल्ल्यातील हात आणि पाय विसरणार नाही. ज्यांनी महिलांवर अत्याचार केले. त्यांना सोडणार नाही. शिवथाळी कोण कुणाला देतयं हे पाहूच, असं सांगतानाच प्रसादाची परतफेड कशी करायची एवढं आम्ही शिकलो आहे. शिवसेनेतच शिकलो आहे. परतफेड योग्यवेळी कशी करायची हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही दिलेली थाळी व्हेज होती, तर नॉनव्हेज थाळी कशी द्यायची हे आम्हाला चांगलं माहीत आहे. त्यामुळे सांभाळा. स्वत:ला सांभाळा नाही. तर विनाकारण तुमच्या वाटेला कधी शिवथाळी येईल हे तुम्हाला समजणारही नाही, असं राणे म्हणाले.वैभव नाईकने काही हल्ला केला नाही. तुमच्याकडे फुटेज असेल तर पाहा. उलट तो पळून गेला. तो कसला हल्ला करतोय, असंही ते म्हणाले.