Ratnagiri | राजापुरात भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले, नगरसेवक विनय गुरव यांनाही धक्काबुक्की
नारायण राणे यांच्या वक्तव्याचे पडसाद रत्नागिरीमध्ये उमटले आहेत. राजापुरात भाजप-शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडले. सेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यानंतरचा व्हिडिओ व्हायरल व्हायरल झाला आहे. यादरम्यान राजापूरचे नगरसेवक विनय गुरव यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आपल्या वक्तव्याची किंमत चुकवावी लागली. काल त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आणि रात्री उशिरा जामीनही मंजूर करण्यात आला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केला. मात्र, त्यांच्या अटकेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहेत. नारायण राणे यांच्या वक्तव्याचे पडसाद रत्नागिरीमध्ये उमटले आहेत. राजापुरात भाजप-शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडले. सेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यानंतरचा व्हिडिओ व्हायरल व्हायरल झाला आहे. यादरम्यान राजापूरचे नगरसेवक विनय गुरव यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आहे.
Latest Videos