‘ईडीवर बोलू नको, बीडी प्यायला लावतील’; नारायण राणेंचा संजय राऊतांना टोला
राऊतांच्या आरोपांना आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. सुधीर मुनगंटीवार आणि मोहित कंबोज यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिल्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार हल्ला चढवला.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. इतकंच नाही तर राऊतांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya), मोहित कंबोज आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांच्या आरोपांना आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. सुधीर मुनगंटीवार आणि मोहित कंबोज यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिल्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीही भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार हल्ला चढवला. संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. हाच धागा पकडत ईडीवर बोलू नको, विडी प्यायला लावतील, असा जोरदार टोला राणेंनी लगावला आहे.
Latest Videos