अखेर ठरलं… रत्नागिरी-सिंधुदुर्गातून नारायण राणे लढणार लोकसभा, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
रत्नागिरी-सिंधुदुर्गातून नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून लोकसभा उमेदवारांची १३ वी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली यामध्ये नारायण राणे यांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी देण्यात आल्याचे पाहायला मिळतंय.
रत्नागिरी-सिंधुदुर्गातून भाजपचे नेते आणि मंत्री नारायण राणे हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गातून नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून लोकसभा उमेदवारांची १३ वी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली यामध्ये नारायण राणे यांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी देण्यात आल्याचे पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा चर्चेत असून तेथील लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांच्या नावाचा तिढा कायम होता. मात्र आज शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे बंधू किरण सामंत यांच्या सोबत पत्रकार परिषदत घेत त्यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. हा निर्णय जाहीर होताच दुसरीकडे याच जागेवर भाजपकडून नारायण राणे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. त्यामुळे आता नारायण राणे यांचा सामना ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांच्यासोबत रंगताना पाहायला मिळणार आहे.