Special Report | बँक अध्यक्षांच्या दालनात नारायण राणेंचाच फोटो, निवडणुकीनंतरही वादाचा धुरळा सुरू

| Updated on: Jan 15, 2022 | 9:57 PM

बँकेत फक्त केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. जिल्हा बँकेत भाजपच्या झालेल्या विजयानंतर अध्यक्षाच्या दालनातील महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो तात्काळ काढण्यात आले आहेत.

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपची सत्ता येताच आघाडीच्या नेत्यांचे फोटो बँकेतून काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही फोटो हटविण्यात आले आहेत. बँकेत फक्त केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. जिल्हा बँकेत भाजपच्या झालेल्या विजयानंतर अध्यक्षाच्या दालनातील महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो तात्काळ काढण्यात आले आहेत. याचं मुद्यावरून शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली आहे. जिल्हा बँकेत शिवसेना आणि महाविकास आघाडीची सत्ता असताना नारायण राणेंचा फोटो देखील दालनात होता, तो त्यावेळी आम्ही हटवला नव्हता मात्र राणेंकडे सत्ता गेल्या नंतर त्यांनी आघाडीच्या नेत्यांचे फोटो हटवले आहेत. ज्या बाळासाहेबांबद्दल राणे नेहमी बोलत असतात त्यांचा आणि शरद पवार यांचा फोटोही दालनातून हटवण्यात आला आहे. यातून राणेंची प्रवृत्ती समोर आली आहे, अशी टीका शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.