समीर वानखेडे दिल्लीत, पंच प्रभाकर साईलच्या आरोपांवरुन एनसीबीच्या मुख्यालयात चौकशी

समीर वानखेडे दिल्लीत, पंच प्रभाकर साईलच्या आरोपांवरुन एनसीबीच्या मुख्यालयात चौकशी

| Updated on: Oct 26, 2021 | 1:06 PM

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे दिल्लीत दाखल झाले आहेत. मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टीवरील धाड प्रकरणी पंचांनीच समीर वानखेडे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले होते.

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे दिल्लीत दाखल झाले आहेत. मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टीवरील धाड प्रकरणी पंचांनीच समीर वानखेडे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले होते. त्यानंतर एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने गंभीर दखल घेत वानखेडेंना तातडीने दिल्लीला बोलावणे पाठवले होते. वानखेडेंची दिल्लीत खात्यांतर्गत चौकशी होणार असून त्यासाठीच त्यांना दिल्लीत बोलावल्याची माहिती एनसीबीचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली होती.