Special Report | महंत नरेंद्र गिरी यांची हत्या की आत्महत्या?

Special Report | महंत नरेंद्र गिरी यांची हत्या की आत्महत्या?

| Updated on: Sep 21, 2021 | 11:53 PM

Narendra Giri Death: आता कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच सीडीआरमधून अनेक पुरावे मिळाल्याचं सांगितलं जात आहे. मृत्यू होण्याच्या 6 ते 10 तास आधी ज्या ज्या लोकांशी नरेंद्र गिरी बोलले, त्या सर्वांची आता चौकशी होणार आहे.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी (Narendra Giri Death) यांचा संशयास्पद मृत्यू झाला. आणि त्यानंतर आता अनेक गोष्टी समोर यायला सुरुवात झाली आहे. नरेंद्र गिरी हे अल्लापूरच्या बाघंबरी या ठिकाणी गळफास लावलेल्या स्थितीत आढळले होते. मात्र आता महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाला आता गंभीर वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण, आधी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली होती तर आता कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच सीडीआरमधून अनेक पुरावे मिळाल्याचं सांगितलं जात आहे. मृत्यू होण्याच्या 6 ते 10 तास आधी ज्या ज्या लोकांशी नरेंद्र गिरी बोलले, त्या सर्वांची आता चौकशी होणार आहे. पोलिस तपासादरम्यान नरेंद्र गिरी महाराज यांच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली होती. ही सुसाईड नोट तब्बल 7 पानी असल्याचं कळतं आहे. तसंच या चिठ्ठीत शिष्य आनंद गिरी यांच नाव लिहिल्यानं आता आनंद गिरी यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु आहे.