Sharad Pawar यांना कोरोनाची लागण, नरेंद्र मोदींनी केली फोनवरून तब्येतीची विचारपूस

| Updated on: Jan 24, 2022 | 7:29 PM

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी फोन केला. त्यांच्या काळजीबाबत आणि शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे’, असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यासंदर्भात स्वत: पवार यांनी ट्विटरवरुन माहिती दिलीय. दरम्यान, पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शरद पवार यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याबाबतची माहितीही पवार यांनी दिलीय. त्याचबरोबर पवार यांनी पंतप्रधान मोदींचे आभारही मानले आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी फोन केला. त्यांच्या काळजीबाबत आणि शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे’, असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.