नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचा दौरा अर्धवट सोडला, दिल्लीत उच्चस्तरीय बैठक
रशिया आणि यूक्रेनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीत काय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या उच्च स्तरीय बैठकीत होई शकते.
यूक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा चौथा दिवस सुरु आहे. रशिया यूक्रेनवर आक्रमकपणे हल्ला करत आहे. लाखो लोक यूक्रेन सोडत आहेत. हजारो भारतीय विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचा दौरा अर्धवट सोडला आहे. रशिया आणि यूक्रेनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीत काय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या उच्च स्तरीय बैठकीत होई शकते.
Latest Videos