जालन्यातील घटनेत काही नेते राजकीय पोळी भाजतायत, नरेंद्र पाटील यांचा कोणावर निशाणा?
VIDEO | उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अशोक चव्हाण या तिघांचे मराठा आरक्षणसाठी योगदान काय? अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा थेट सवाल, साताऱ्यात बोलत असताना टीकास्त्र
सातारा, ३ सप्टेंबर २०२३ | उद्धव ठाकरे शरद पवार आणि अशोक चव्हाण या तिघांचे मराठा आरक्षणसाठी योगदान काय? असा सवाल अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलाय. जालनामध्ये विरोधी पक्ष जाऊन आले ते आधी सत्तेत होते. उद्धव ठाकरे यांचे योगदान काय, शरद पवार आणि अशोक चव्हाण यांनी काय केले. या तिघांचे मराठा आरक्षण बाबत योगदान शून्य आहे, अशी टीका नरेंद्र पाटील यांनी केले. ते सांगलीमध्ये आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ शिबिरात बोलत होते. जालन्यात मराठा लढवय्या कार्यकर्त्याच उपोषण सुरू होते. ते हाताळण्यात पोलिसांना अपयश आले. त्याचा निषेध केला आहे. अमानुष मारहाण करण्यात आली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आज एकनाथ शिंदे सरकारच्या काळात आंदोलनास बसले आहेत. पण अचानकपणे हा प्रकार का घडला याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. काकाकडे लोक नाहीत आमदार नाहीत. पुतण्याकडे सर्व गेले आहे. उध्दव ठाकरे यांच्याकडे शिवसेना नाही शिंदे साहेबांकडे गेली आहे. त्यांना मराठा समाजासाठी काही करता येत नाही हे दुर्भाग्य आहे, असा निशाणा साधत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.