Narendra Patil | मराठा क्रांती संघर्ष मोर्चात नरेंद्र पाटील सहभागी होणार
उद्या शनिवारी बीडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाचे आयोजन केलं आहे. या मोर्चात माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात प्रचंड प्रमाणात रोष आहे. 5 जून रोजी बीड येथे मराठा समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. सदरचा मोर्चा मराठा क्रांती मोर्चांच्या प्रथेप्रमाणे शांततेत व शिस्तीत, कायदा व सुव्यवस्थेला कुठलीही बाधा येऊ न देता काढला जाईल.
Latest Videos