Naresh Mhaske : संजय राऊत यांच्यावर जहरी टीका, शिंदे गटाच्या नेत्याची जीभ घसरली
VIDEO | राज्यात सध्या चोर आणि लफंग्यांचं सरकार आहे. राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून काम करत आहेत. चोरांना सुरक्षा देत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केली. यावर टीकेवर शिंदे गटाच्या नेत्याचं जशास तसे प्रत्युत्तर
ठाणे, १७ ऑक्टोबर २०२३ | राज्यात सध्या चोर आणि लफंग्यांचं सरकार आहे. राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून काम करत आहेत. चोरांना सुरक्षा देत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केली. यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘संजय राऊत जल्लाद आहेत. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारापासून बाजुला करण्याचं काम जल्लाद म्हणून संजय राऊत यांनी केलं आहे, अशी सडकून टीका नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर केली. इतकेच नाही तर हिंदुत्वाच्या विचारांचा खून करण्यासाठी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना भाग पाडलं आहे’, असे म्हणत नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय. संजय राऊत विधानसक्षा अध्यक्षांवर अशी वक्तव्य करून दबाव आणण्याचा प्रयत्न करताय. त्याचा काहीच फरक पडणार नाही, असे म्हणत नरेश म्हस्के यांनी नगरसेवकाची निवडणूक लढवून आणि निवडून दाखवा असे चॅलेंजही दिले आहे.