राज ठाकरेंना नरहरी झिरवळांचं चॅलेंज; म्हणाले, 'त्यांनी तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी'

राज ठाकरेंना नरहरी झिरवळांचं चॅलेंज; म्हणाले, ‘त्यांनी तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी’

| Updated on: Oct 07, 2024 | 5:55 PM

नुकतेच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह अनेक आमदारांनी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवरून उड्या मारुन आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेवरून मनसे अध्य़क्ष राज ठाकरेंनी आज पुण्यात बोलताना जोरदार टीकास्त्र डागलंय. यावरूनच झिरवळ यांनी पलटवार केलाय.

महाराष्ट्राची सर्कस झाली आहे, असे म्हणत कोणी विदुषकी चाळे करत आहे, कुणी मंत्रालयाच्या जाळ्यांवरून उड्या मारत आहेत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे नरहरी झिरवळ यांच्यावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. तर राज्यात कित्येक लोक राजकारणात अशी आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरून उड्या मारायला लावल्या पाहिजे, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी करत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून भाष्य केले. पुण्यात मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण आज करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या या अप्रत्यक्षपणे टीकेवरून नरहरी झिरवळ यांनी पलटवार करत राज ठाकरे यांनाच थेट आव्हान दिलं आहे. ‘कोणाला तमाशा दिसो किंवा सर्कस आदिवासी बांधवांना न्याय देणार’, असं नरहरी झिरवळ म्हणाले. तर ज्यांना कोणाला तसा प्रयोग करायचा असेल तर आणखी डबल जाळी लावून त्यांनी तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी, असं अप्रत्यक्षपणे झिरवळ यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलंय

Published on: Oct 07, 2024 05:55 PM