नरहरी झिरवळ म्हणतात, ‘शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अपात्रच होणार, पण…’
शिंदे गटासह ठाकरे गटातील आमदारांना अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावली आहे. तसेच त्यांनी पुढील सात दिवसात त्यांवर म्हण मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या जोरदार हालचालीमना वेग आला आहे.
रायगड : शिंदे गटाच्या 16 आमदारांवर आता अपात्रतेची टांगती तलावार लटकत आहे. शिंदे गटासह ठाकरे गटातील आमदारांना अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावली आहे. तसेच त्यांनी पुढील सात दिवसात त्यांवर म्हण मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या जोरदार हालचालीमना वेग आला आहे. यादरम्यान ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर 14 जुलैला सुनावणी होणार आहे. राज्यात सध्या असे चित्र असतानाच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं वक्तव्य केल्यानं राज्याचं राजकारण तापलेलं आहे. झिरवळ यांनी सर्व बाजूनं विचार केल्यास शिवसेनेचे 16 आमदार अपात्र ठरतील असं वक्तव्य केलं आहे. पण आपण त्यावर काही बोलणार नाही. त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्ष आणि विधीमंडळाचे आहेत. त्यामुळे मी बोलणार नाही असेच त्यांनी म्हटलं आहे. ते रोहा येथे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) सुनील तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते.