वडील दादांच्या राष्ट्रवादीत अन् मुलानं हजेरी लावली मोठ्या साहेबांच्या कार्यक्रमात; झिरवळ कुटुंबात चाललंय काय?
पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात नरहरी झिरवाळ यांचा मुलगा गोकुळ झिरवळ हे हजर दिसले. गोकुळ झिरवळ दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. विशेष म्हणजे नरहरी झिरवळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. मात्र नरहरी झिरवाळ यांचा मुलगा गोकुळ झिरवळ हे शरद पवार गटाच्या मेळाव्यात हजर
जयंत पाटील यांच्या नाशिकमधील एका कार्यक्रमाला नरहरी झिरवाळ यांच्या मुलाची उपस्थिती बघायला मिळाली. पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात नरहरी झिरवाळ यांचा मुलगा गोकुळ झिरवळ हे हजर दिसले. गोकुळ झिरवळ दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. विशेष म्हणजे नरहरी झिरवळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. मात्र नरहरी झिरवाळ यांचा मुलगा गोकुळ झिरवळ हे शरद पवार गटाच्या मेळाव्यात हजर राहिल्याने चर्चांना एकच उधाण आल्याचे पाहायला मिळतंय. अशातच महाविकास आघाडीने जबाबदारी दिली तर आगामी विधानसभा निवडणूक लढणवार असल्याचे वक्तव्य करत गोकुळ झिरवळ यांनी निवडणूक लढवण्याची इच्छाही व्यक्त केली. लोकसभेत आम्ही दिंडोरीत मविआचं काम केलं. दिंडोरीत आमदारकीसाठी मी इच्छुक आहे. नरहरी झिरवाळांची निष्ठा अजित पवारांसोबत आहे तशी माझी निष्ठा शरद पवारांसोबत असणार आहे, असेही ते म्हणाले.

आरोपी दत्ता गाडेला थोड्याच वेळात शिवाजीनगर कोर्टात हजर करणार

'कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का...', ठाकरेंचा शिंदेंना पलटवार

मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा 'तो' मेसेज कुठून आला?

महिलांनो घाबरू नका...स्वारगेट प्रकरणानंतर राज्य महिला आयोग ॲक्शन मोडवर
