Nagpur Narsala Gaon | वैदू समाजातील 15 कुटंबांना गावातून हकलण्याचा डाव, नरसाळा ग्रामपंचायतीचा ठराव

| Updated on: Jun 14, 2022 | 12:50 PM

‘दुसऱ्या जातीचे आणि राहणीमान नीट नसल्याने गावातून हाकलण्याचा डाव’करण्यात आला आहे.

नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर येतेय. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील नरसाळा इथे ही घटना घडली आहे. मौदा तालुक्यातील नरसाळा गावातील 15 वैदु कुटुंबांना गावातून हाकलून देण्यात आलं आहे. 15 वैदू समाजातील 75 जणांना गावातून हाकलण्यासाठी ग्रामपंचायतीनं पारीत केलं ठरावं. ‘दुसऱ्या जातीचे आणि राहणीमान नीट नसल्याने गावातून हाकलण्याचा डाव’करण्यात आला आहे. संविधानिक मानवाधिकाराचं हनन होत असताना प्रशासन गप्प? का असे अनेक प्रश्न इथे निर्माण होत आहेत. 10 वर्षांपासून वैदू समाजाचे लोक राहतात या गावात राहतात. गावोगावी भटकंती करुन जडीबूटी विकणारा वैदू समाज आहे. वैदू समाजाचे ना राशन कार्ड ना मुलांना शाळेत शिक्षण. आता प्रशासन यावर काय निर्णय घेणार हे महत्वाचं आहे.

Published on: Jun 14, 2022 12:50 PM
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 14 June 2022
VIDEO : Sanjay Raut On PM Modi | जर मोदी 10 लाख लोकांना नोकऱ्या देणार असतील तर त्यांचे स्वागत आहे – Raut