शिक्षकाची अनोखी कला, फलकावर साकारलं प्रभू श्रीरामाचं रेखीव चित्र
VIDEO | रामनवमी निमित्तानं शिक्षकानं साकारलं श्रीरामाचं फलकावर रंगीत खडूंच्या माध्यमातून सुंदर चित्र, बघा व्हिडीओ
नाशिक : देशभरात आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. रामभक्तांचा हा उत्साह शिगेला पोहोचला आहे. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या राम मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीराम जन्मोत्सव आज सर्वत्र मोठ्या उत्सहात भक्तीभावाने विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत असताना आदर्श, धार्मिकता, प्रेम, बंधुता आणि भक्तीचे प्रतिक असलेल्या अशा या श्रीरामाचं फलकावर रंगीत खडूंच्या माध्यमातून सुंदर चित्रं साकारलं आहे. हे चित्र चांदवडचे कला शिक्षक देव हिरे यांनी साकारत सर्वांना भक्तीमय शुभेच्छा दिल्या आहेत. बघा कला शिक्षकानं साकारलेलं रेखीव चित्र…
Latest Videos