मनसेच्या ‘या’ नेत्यानं दिला शहराध्यक्ष पदाचा राजीनामा, सोडचिठ्ठीनंतर जिल्ह्यात एकच चर्चा
VIDEO | मनसेत खळबळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहराध्यक्ष यांचा राजीनामा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी राजीनामा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यावरुन मनसेत एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. राजीनामा दिल्यानंतर काही क्षणातच दिलीप दातीर यांच्या राजीनाम्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. दिलीप दातीर यांनी 2019 मध्ये पश्चिम विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आमदारकीचे तिकीट नाकारल्याने दिलीप दातीर यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर दिलीप दातीर यांच्यावर नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून मनसेची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर दिलीप दातीर यांच्याकडे शहाराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आज त्यांनी त्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा दिला असून तो मंजूर करावा म्हणून विनंती केली आहे. तर दिलीप दातीर यांनी राजीनाम्या देण्यामागील कारण वैयक्तिक असल्याचे सांगितले आहे.