'आज माझ्यावर अन्याय झाला', म्हणत आमदार सरोज अहिरे यांच्या डोळ्यांत आलं पाणी; बघा व्हिडिओ

‘आज माझ्यावर अन्याय झाला’, म्हणत आमदार सरोज अहिरे यांच्या डोळ्यांत आलं पाणी; बघा व्हिडिओ

| Updated on: Feb 27, 2023 | 3:15 PM

VIDEO | राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानभवनात आलेल्या सरोज अहिरे आपल्या बाळाला घेऊन माघारी फिरल्या, पण का?

गिरीश गायकवाड, मुंबई : मुंबई येथे आजपासून सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या बाळासह विधानभवनात दाखल झाल्या होत्या मात्र त्या परत माघारी फिरल्या. सरोज अहिरे यांनी आई आणि लोकप्रतिनिधी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत असल्याने संपूर्ण राज्यासह देशभरात चर्चा होतेय. सरोज अहिरे या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही आपल्या तान्हुल्यासह हजर झाल्या होत्या. याच दरम्यान सरोज अहिरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटून कौतुक केले होते. यावेळी हिरकणी कक्ष सुरू करत असल्याची घोषणा केली होती. मात्र आज सरोज अहिरे या आपल्या बाळाची तब्येत बरी नसतांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजर होत्या. सरोज अहिरे या हिरकणी कक्षाकडे आपल्या बाळाला घेऊन जात असतांना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. मात्र, त्यावेळी हिरकणी कक्षाची स्थिती पाहता सरोज अहिरे बाहेर आल्या आणि परत माघारी निघाल्या.

Published on: Feb 27, 2023 03:15 PM