शेतकरी-आदिवासींच्या लॉंगमार्चचा तिसरा दिवस; मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, तोडगा न निघाल्यास भूमिका काय?
Farmer Adiwasi Longmarch : 14 प्रकारच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. काही मुद्द्यांवर गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र काही मागण्यांवर अंमलबजावणी झाली नाही. असं या आंदोलकांचं म्हणणं आहे. पाहा व्हीडिओ...
नाशिक : शेतकरी-आदिवासी यांच्या लॉंगमार्चचा आजचा तिसरा दिवस आहे. थोड्याच वेळात लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघणार आहे. अंबेबहुला गावातून आज हा लाँग पुढे निघणार आहे. आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार आहे. दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळाची बैठक होईल. या बैठकीत तोडगा निघणार का? याकडे लक्ष असेल. तोडगा न निघाल्यास लाल वादळ मुंबईच्या दिशेने चालत राहणार आहे. 14 प्रकारच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. काही मुद्द्यांवर गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. काही मागण्यांवर अंमलबजावणी झाली नाही. असं या आंदोलकांचं म्हणणं आहे.
Published on: Mar 14, 2023 08:19 AM