Ajit Pawar तेव्हा मीडियापुढे रडले…, शेतकऱ्याचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत, बघा व्हिडीओ
tv9 Special report | नाशिक दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यापुढे काही शेतकऱ्यांनी कांदे आणि टोमॅटो फेकत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.अजित पवार यांच्या ताफ्यापुढे फेकले कांदा-टोमॅटो अन् सरकारविरोधात काय दिल्या घोषणा?
मुंबई, ८ ऑक्टोबर २०२३ | नाशिक दौऱ्यावर असताना अजित पवारांच्या ताफ्यापुढे काही शेतकऱ्यांनी कांदे आणि टोमॅटो फेकत सरकारविरोधात घोषणा दिल्याचे पाहायला मिळाल्या. दरांबरोबरच याआधीच्या भूमिका काय होत्या, याबद्दलही शेतकऱ्यांनी अजित पवारांवर टीका केला. तर विरोधात असताना कांद्यासाठी सरकारला घेरणारे आता गप्प का, असा प्रश्न शेतकरी करतायत. नाफेडकडून खरेदी-अनुदान-निर्यातशुल्क अशा अनेक बाबींवर शेतकऱ्यांच्या आक्षेप आहे. विरोधात असताना यावरुन तातडीनं कार्यवाहीची मागणी करणारे अजित पवार सत्तेत गेल्यानंतर समन्वयातून मार्ग निघण्याचं आश्वासन देतायत. यापैकी एका शेतकऱ्यानं 2019 च्या एका प्रसंगाकडे बोट दाखवलं. विधानसभा निवडणुकीआधी ईडीची नोटीस आल्यानंतर अजित पवार काही काळा संपर्काबाहेर होते. समोर आल्यानंतर भाजपवर सूडाचा आरोप करत त्यांना अश्रूही अनावर झाले होते. मग आता भूमिका काय, असा प्रश्न शेतकऱ्यानं केलाय. बघा स्पेशल रिपोर्ट