Nashik | नाशिकमध्ये पोलीस असल्याचे सांगून महिलेची भररस्त्यात लूट

Nashik | नाशिकमध्ये पोलीस असल्याचे सांगून महिलेची भररस्त्यात लूट

| Updated on: Aug 12, 2021 | 9:40 AM

नाशकात पोलीस असल्याचे सांगून भररस्त्यात महिलेची लूट करण्यात आली आहे. सोनसाखळी चोरांनी पोलीस असल्याचं सांगत महिलेचे दागिने लांबवले. अंगावरचे दागिने पिशवीत ठेवा अस सांगत हे चोरटे महिलेचे दागिने घेऊन पसार झाले आहेत. या चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

नाशकात पोलीस असल्याचे सांगून भररस्त्यात महिलेची लूट करण्यात आली आहे. सोनसाखळी चोरांनी पोलीस असल्याचं सांगत महिलेचे दागिने लांबवले. अंगावरचे दागिने पिशवीत ठेवा अस सांगत हे चोरटे महिलेचे दागिने घेऊन पसार झाले आहेत. या चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. नाशिकच्या हिरावाडी परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने खळबळ माजली आहे. या महिलेच्या अंगावरच्या सात तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन हे चोर पसार झाले. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.