केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर प्राध्यापक करताय पीएचडी, कारण...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर प्राध्यापक करताय पीएचडी, कारण…

| Updated on: May 28, 2023 | 6:39 AM

VIDEO | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर राज्यशास्त्रच्या प्राध्यापकाची पीएचडी, कुठं आहे तो अवलिया शिक्षक

नाशिक : कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक मारुती कंधारे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर पीएचडी करत असून ते सध्या या महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषय शिकवत आहे. राजकीय परिस्थिती व राजकीय नेतृत्वाचा विचार केला तर एकमेव नितीन गडकरी यांचे स्थान असून नितीन गडकरी यांचे भ्रष्टाचार मुक्त विकास, कार्यपद्धती, विकासाला दिलेले महत्त्वाचे स्थान तसेच आधुनिक भारताला मोठे करण्याचे काम गडकरी यांनी केले आहे. या सर्व गोष्टीचे संशोधन या अभ्यासातून करणार हे प्राध्यापक करणार आहे. या शिक्षकाने त्यांच्या पीएचडी विषयाचा टायटल हे नितीन गडकरी सामाजिक व राजकीय चिकित्सक अभ्यास.. दिले असून त्यांच्या जन्मापासून तर केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा सर्व गोष्टींचा आढावा घेणार आहे.

पीएचडीचे या शिक्षकाचे हे तिसरे वर्ष असून नितीन गडकरी यांच्यावर विविध विषयांवर व त्यांच्या कर्तुत्वावर या विषयावर हे शिक्षक अभ्यास करत आहे. सन 2014 मध्ये 8 ते 9 किलोमीटर रस्ते तयार होत होते आज 45 ते 48 किलोमीटर पर्यंत दर दिवशी होत आहे तसेच सामजिक कार्य महत्वाचे आहे आरोग्यला महत्व दिले असून 8 हजार लोकांच्या ह्दय शस्त्रक्रिया ,55 हजार लोकांचे डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या अडीच लाख लोकांना चष्म्याचे वाटप करण्यात आले आहे 8 हजार अपंग व्यक्तींना हात ,पायाचे वाटप केले तसेच विद्यार्थ्यांसाठी शाळा ही बांधल्या आहे वर्धा जिल्ह्यातील तामसवाडा प्रकल्पामुळे पंधरा ते वीस आदिवासी पाड्यांची जमीन वलीताखाली आली आहे त्यामुळे त्यांनी नितीन गडकरी यांच्या कार्यपद्धतीचा विषय निवडला आहे.

Published on: May 28, 2023 06:39 AM