कांद्याचे दर 2 ते 4 रुपयांपर्यंत कोसळले; महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना आक्रमक

| Updated on: Feb 27, 2023 | 2:18 PM

नाशिकमध्ये कांद्याला योग्य भाव मिळावा, यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.कांदा दर प्रश्नी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पाहा व्हीडिओ...

नाशिक : नाशिकमध्ये कांद्याला योग्य भाव मिळावा, यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.कांदा दर प्रश्नी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे बाजार भाव 2 ते 4 रुपयांपर्यंत कोसळलेत. त्यामुळे लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. विक्री झालेल्या कांद्याला प्रति किलो दहा रुपये अनुदान मिळावं, अशी मागणी करण्यात आली आहे. विक्री होणाऱ्या कांद्याला 30 रुपये किलो हमीभावाची मागणी करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत लिलाव चालू होऊन न देण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

Published on: Feb 27, 2023 02:18 PM
नाफेडमध्ये हरभरा विक्रीसाठी नोंदणी करण्यासाठी शेतकरी रांगेत; पोलिसांकडून लाठीचार्ज
हा महाराष्ट्राचा अपमान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जितेंद्र आव्हाड असे का म्हणाले?