100 टक्के नाराजी दूर… बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटील हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी मैदानात
माझी नाराजी दूर झाली असून हेमंत गोडसे यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचं नाशिकचे भाजपचे नेते दिनकर पाटील यांनी सांगितलं. शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार हेंमत गोडसे यांना दिनकर पाटलांचा विरोध होता मात्र अखेर दिनकर पाटलांची नाराजी दूर...
नाशिकचे भाजपचे नेते दिनकर पाटलांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी दिनकर पाटलांना युती धर्म पाळण्याच्या चंद्रशेखर बावनकुळे यां चंद्रशेखर बावनकुळे यांन सूचना दिल्यात. माझी नाराजी दूर झाली असून हेमंत गोडसे यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचं दिनकर पाटील यांनी सांगितलं. शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार हेंमत गोडसे यांना दिनकर पाटलांचा विरोध होता मात्र अखेर दिनकर पाटलांची नाराजी दूर झाल्याची माहिती त्यांनी स्वतःच दिली. ‘नाशिक लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाला जागा गेली आहे. त्यानंतर आज बावनकुळे यांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं मोदी यांना तिसऱ्यांना पंतप्रधान करायचे आहे. युती धर्म पाळायचा आहे. योग्यवेळी योग्य न्याय देण्यात येईल. जो काम करेल त्याला न्याय मिळणारच आहे. त्यामुळे आता 100 टक्के नाराजी दूर झालेली आहे, असे दिनकर पाटील यांनी म्हटले.