मतदान करायला आले अन् EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. शांतीगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रवर मतदान केले. मात्र यावेळी त्यांनी आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम कक्षाला घातल्याचे पाहायला मिळाले.
नाशिक लोकसभा मतदार संघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. नाशिक लोकसभेसाठी शिवसेनेकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याविरूद्ध ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली. तर शांतिगिरी महाराज हे अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरले. अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. शांतीगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रवर मतदान केले. मात्र यावेळी त्यांनी आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम कक्षाला घातला. यापूर्वी शांतीगिरी महाराज यांनी मतदान केंद्राबाहेर पूजा करून वंदन केले होते. यावरून हा आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आता शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या या प्रकारामुळे शांतीगिरी महाराजांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.